Type Here to Get Search Results !

पुनाडे गावातील सरकारी जमिनीवर गुजराती परप्रांतीयांचा डोळा.

 पुनाडे गावातील सरकारी जमिनीवर  परप्रांतीयांचा डोळा.


जमीन बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्था  या संस्थेला जमीन दिल्यास मोठा जन आक्रोश उफाळून येईल.

शेतकरी, ग्रामस्थ आक्रमक.





उरण दि ८(विठ्ठल ममताबादे)मौजे पुनाडे

 उरण येथील सरकारी जमीन बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्था  अहमदाबाद या संस्थेला देण्याचे विचाराधीन असून याला पुनाडे ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. ही जागा धरण प्रकल्पग्रस्तांची असून त्या प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावी अशी मागणी २०२३ मध्ये करण्यात आली आहे. ती डावलून या संस्थेला देण्यात आली तर मोठा जन आक्रोश उफाळून येईल.असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी,शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.




 उरण तालुक्यातील पुनाडे, वशेणी गावातील हजारो हेक्टर जमीनीत मोठा प्रमाणात भात शेतीचे उत्पादन घेतले जाते. या जमिनीतून दुबार पीक घेता यावे म्हणून महाराष्ट्र शासनाने लघु पाटबंधारे यांच्या माध्यमातून १९८६-८७ मध्येे वरील तिन्ही गावातील जमिनी संपादित करून शेती लागवडीसाठी धरण बांधण्यात आले आहे. या धरणामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी गेल्याने अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन गेले आहे. त्यांच्यावर मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.या मध्ये अनेक शेतकऱ्यांनी अजूनही मोबदला घेतला नाही. शासनाकडून कोणतेही जमीन विकल्याचे पैसे घेतले नाही. त्यावेळी ४० रुपये गुंठा भाव जमिनीला शासनाने दिला होता. शासनाने दिलेला एवढा कमी भाव शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूकच होती.त्यामुळे त्या शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी शेती व फळ लागवडीसाठी गावात असलेल्या शासकीय जमिनी देण्यात याव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे ५ जानेवारी २०२३ रोजी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विचार न करता या शासकीय जमिन बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्था अहमदाबाद या संस्थेला देण्याचे विचाराधीन आहे. तेव्हा गावातील शासकीय जमिनी सदर संस्थेला देण्यात आल्या तर ग्रामस्थांमधून मोठा जन आक्रोश उफाळून येईल असे मत प्रकल्पग्रस्त शेतकरी चंद्रकांत कमल पाटील यांनी व्यक्त केले.स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने विश्वासात घेतले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा आक्रमक इशारा प्रकल्पग्रस्तांनी,शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id- uranshahar@gmail.com





 याबाबतील शासन निर्णय व आदेश रद्द करण्याची मागणी शेतकरी व नागरिक करीत आहेत. सदर प्रकरणी पुनर्वीचर करण्यात यावा, शेतकरी, प्रकल्पग्रस्त यांचे पुनर्वसन करून सदर जमीन त्यांना देण्याची मागणी होतं आहे या प्रकरणी जिल्हा व कोकण विभाग पातळीवर लोकजण सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी यांच्याकडून केली जात आहे.


शिवसेना रायगड माजी जिल्हा प्रमुख शिरीष बुटाला, सामाजिक कार्यकर्ते रमेश गुडेकर यांनी त्यावेळी आवाज उठविला होता. न्याय देण्याचा प्रयत्न केला.आमदार मनोहर जोशी, आमदार वामनराव महाडिक यांनी विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव वाढवून मिळावा यासाठी विधान परिषदेत आवाज उठविला. पण त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात जिथे जिथे धरणे झाले आहेत तिथे तिथे शेतकऱ्यांना जमिनी दिल्या गेल्या आहेत. पुनाडे गावात जमिनी असूनही ते शेतकऱ्यांना दिले गेले नाही. दिल्या जात नाहीत.



आमच्या गावात धरण बांधण्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे एकमेव उत्पादनाचे साधन असलेली शेती व्यवसाय गेला त्यामुळे अनेकांवर मोलमजुरी करून पोट भरण्याचे वेळ आली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी गाव परिसरात असलेली शासकीय जमिन देण्यात यावी अशी मी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने  जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे ५ जानेवारी २०२३ साली मागणी केली आहे. त्याचा विचार न करता आमच्या गावातील शासकीय जमिनी अहमदाबाद येथील संस्थेला देण्याचा घाट शासनाने घातला आहे. तो आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही.

     

प्रकल्पग्रस्त शेतकरी, पुनाडे ग्रामस्थ

Post a Comment

0 Comments