खोपटे गावातील सामाजिक कार्यकर्ते गोरख रामदास ठाकूर ह्यांच्या समवेत खोपटे गावातील व उरण पूर्व विभागातील जनतेने केलेल्या पाठपुराव्याला यश.
नवीन वीज जोडणीचे उदघाटन.
शासकीय अधिकाऱ्यांचा केला सत्कार.
उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील खोपटे गावातील सामाजिक कार्यकर्ते गोरख रामदास ठाकूर ह्यांच्या समवेत खोपटे गावातील व उरण पूर्व विभागातील जनतेने जुलै २०२१ पासून केलेल्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या RDSS व SSMR योजनेतील काम पूर्ण झाल्याने MSEB चे Additional Executive Engineer विकास गायकवाड व सहाय्यक अभियंता सातपुते सर व उरण पूर्व विभागातील तरुणांच्या हस्ते दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी छोटेखानी नवीन वीज जोडणीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ह्या कामासाठी गोरख ठाकूर ह्यांनी सातत्याने पाठपुरावा Additional Executive Engineer विकास गायकवाड ह्यांच्या कडे केला आणि त्यांनी ते काम पूर्णत्वास आणले. म्हणून त्यांचाही तिथे विशेष सत्कार करण्यात आला.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा...
Mail id---uranshahar@gmail.com
पुढील आठवड्यापासून उरण पूर्व विभागासाठी नवीन वीज जोडणी लाईन कार्यान्वित करण्यात येणार आहे. ह्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उरण पूर्व विभागातील विनोद पाटील, प्रांजल पाटील, रोहित भगत, हरिश्चंद्र म्हात्रे, विनय ठाकूर, महेंद्र पाटील, अनिकेत ठाकूर, वैभव घरत, पराग ठाकूर, अक्षय ठाकूर, हेमंत ठाकूर, सुयश पाटील, समाधान म्हात्रे, राहुल ठाकूर व इतर तरुण उपस्थित होते.

.jpg)
Post a Comment
0 Comments