Type Here to Get Search Results !

सेंटमेरी शाळेत लहान वयातच दिले जात आहे जुगाराचे बाळकडु?🔶

 🔶उरण सेंट मेरी शाळेत लहान वयातच दिलेजात आहे जुगाराचे बाळकडु?🔶



(उरण दि. १६ डिसेंबर २०२५ )

   शिक्षण क्षेत्रातील अनागोदी कारभार ,शाळा संचालकांची मनमानी आणी अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेवर राज्यभरातील पालक वर्गाच्या मनात,असुरक्षा आणी चिंतेचे वातावण निर्माण होत असतांनाच  उरण येथीले सेंटमेरी शाळेत शिक्षण कमी पण पालकांना खर्च जास्त होत असल्याची बोंब  पालकांकडून मारली जात आहे.

 या विषयी जनमनातुन अनेक  उलटसुलट चर्चा ऐकावयास  येत आहेत .

  शेक्षणिक सहल म्हणजे संचालकांची आणी शिक्षकांची चंगळच म्हणावी लागेल 

एखाद्या  रिसॉर्ट ला आधीच संपर्क  साधुन  आपल्या मर्जीप्रमाणे बजेट सेट करून  कार्यक्रम  आखला जातो आणी त्याचा अनाठाई फटका आणी एक प्रकारे बुरदंडच पालकांना सहन करावा लागतो अस अनेकांकडून सांगण्यात येत.

     जुनिअर केजी, पासुन लहान मुलांना लकी ड्रा कुपन कंपल्सरी घेण्यासाठी आग्रह केला जातो. प्रत्येक मुलाने लकी draw कुपन चे ५०० रुपये घेऊन यायला सांगितले जाते शिवाय  fun fair स्टॉल साठी वेगळे ५०० रुपये आणायला सक्तिने सांगीतले असुन एकुण १ हजार रुपये प्रत्येक विद्यार्थी ना  येवढे पैसे का मागीतले जातात शाळेन आपल्या तर्फे हे अतीरीक्त मनोरंजन आणी सहलीचे  कार्यक्रम केले पाहीजेत असं अनेक पालकांना वाटतं.  हा सक्तीचा लकी ड्रा    लहान मुळे खेळत असली तरी  लकी ड्रा करीताची कुपन मुले कुठे विकायला जाणार?  एका वर्गात ७० च्या वर मुलं असुन प्रत्येक मुलं कडून १००० रुपये कंपल्सरी घेतले जात आहेत मग ही कुपन विकण्याची सक्ती का? असही विचारल जात आहे. शाळेला प्रत्येकी 1000 × 70 मुले  म्हणजे 70000 ऐवढी  कमाई मीळत आहे . एका क्लास मधून, अ, ब, क A. B. C असे तीन क्लास मधून लाखो रुपये येवढी ही 

डिसेंबर मध्ये शाळेची कमाई ती पण fan fair च्या नावाने. लहान मुलांना १, २ री च्या मुलांन कडे. लकी ड्रा म्हणजे एकप्रकारे हा जुगारच नाही का,लहान शाळेतल्या मुलांना लहान वयातच लकी ड्रा चा नावाने जुगार शिकवलं जातोय ते पण उरण शहरा सारख्या नावाजलेल्या शाळेतून. लहान  वयातच मुलांना जुगार शिकवलं जातोय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.


🔶🔶🔷बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा...🔶🔶🔷

Mail id

 uranshahar@gmail.com




५०रुपयाच्या तिकिटावर आपल्याला मोठा गिफ्ट भेटेल हे त्यांना लहान वयातच शाळेतून शिकवले जातय याकडे शिक्षणाधिकारी आणी संबंधित  वरिष्ठांकडून आपला खुलासा मागणे आवश्यक  आहे अशी मागणी पालक वर्गातील जागरूक नागरीकांमधुन पुढे येत आहे कारण हा एकप्रकारे जुगारच आहे आणी तो मुलांना पुढेकरून खेळला जातोय त्या मुळे  हे लहान पणीच पाजले जाणारे जुगाराचे बाळकडू बघुन संतापलेले पालक 

  आयचा घो ! या शिक्षणाचा 

असं दबत्या आवाजात बोलत आहेत.काही पालक तर उरणच्या पुढऱ्यांनीच उरण ची शिक्षण क्षेत्रात वाट लावली असे बोलत आहेत,

 या बाबद संबंधितांची प्रतीकीया घेण्या साठी प्रयत्न केला असता कुणाचाही संपर्क  होऊ शकला नाही.


Post a Comment

0 Comments