Type Here to Get Search Results !

उरणमध्ये चोरांचा सुळसुळाट: पोलिसांची नाका बंदी आणि चेकिंग न केल्याने नागरिक असमाधानी

 

🔶 उरणमध्ये चोरांचा सुळसुळाट: पोलिसांची नाका बंदी आणि चेकिंग न केल्याने नागरिक असमाधानी 🔶


चोरट्यांनी गुरांसोबत तरुणालाही गाडीत डांबले,सतर्क नागरिकांच्या धाडसाने चोरटे जेरबंद. 





जखमी उमेश कोळी व गुरांची सुखरूप सुटका.


उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )

उरण तालुक्यातील चाणजे परिसरात रविवारी पहाटे दोन ते साडेतीनच्या सुमारास एखाद्या चित्रपटालाही मागे टाकेल असा थरार पाहायला मिळाला जनावरे चोरण्यासाठी आलेल्या टोळीने त्यांना हटकणाऱ्या तरुणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणाची सतर्कता आणि गावकऱ्यांच्या धाडसामुळे चोरट्यांची गाडी उलटली आणि उरण पोलिसांनी तीन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 

   रविवारी पहाटे साडेतीन च्या सुमारास उमेश महादेव कोळी हा तरुण कामावरून घरी परतत असताना त्याला काही अज्ञात व्यक्ती फोरविलर गाडीतून गुरे पळवताना दिसले. उमेशने त्यांना जाब विचारला असता चोरट्याने त्यालाच पकडून गाडी डांबले आणि गुरांसोबत बांधून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी गावकर्यांना गावात चोर आल्याची बातमी आली 

    गावकऱ्यांनी गाड्या काढून चोरट्यांच्या  गाडीचा पाठलाग सुरू केला. गावकऱ्यांची जिद्द पाहून चोरट्याने वेगाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या धावपळीत चोरट्यांची गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. मोठा आवाज आणि आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिक जागे झाले. 

    गुरांसोबत आपल्या गावातील तरुणालाही बांधून नेल्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी चोरट्यांना घटनास्थळी चांगला चोप दिला. माहिती मिळताच उरण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तीन चोरट्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची गाडी जप्त केली. पोलीस एफ आय आर क्रमांक ००३२, भारतीय न्याय संहिता

२०२३कलम११८(१),११५(२),१२७(२) ,३५२(१),१४०(१) ३(५),महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम१९७६, नुसार कलम ५ ए, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ कलम ९,आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम१९६०  ११(१) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून या  घटनेवर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले असून पुढील तपास चालू आहे. 

  उरण तालुक्यातील मागील अनेक दिवसांपासून  गाडीने गुरे चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. आजच्या या घटनेमुळे ही मोठी टोळी उजेडात आली आहे. तरीही शेतकऱ्यांनी ,नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क रहावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.



बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com





 उरणमध्ये चोरांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे, आणि नागरिकांचा आरोप आहे की पोलिसांची नाका बंदी आणि चेकिंग न केल्याने ही समस्या वाढत आहे. रात्रीच्या वेळेस उरण पोलिसांची कुठेही नाका बंदी किंवा चेकिंग होताना दिसत नाही,बिट निरीक्षक पण गावात फिरकत नाहीत ज्यामुळे चोरांना आपले काम करणे सोपे झाले आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की पोलिसांनी रात्रीच्या वेळेस अधिक सतर्क राहावे आणि नाका बंदी आणि चेकिंग करावे जेणेकरून चोरांना रोखता येईल. 




Post a Comment

0 Comments