🔶शिरढोण येथे विविध कार्यक्रमांतून धर्मांतराचा संशय, नागरिकांमध्ये चिंता🔶
शिरढोण/पनवेल ता.३१
उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण
येथे ‘दि पेन्टेकोस्टल मिशन, मुंबई’ या संस्थेच्या वतीने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आडून हिंदू समाजातील नागरिकांचे धर्मांतर करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शिरढोण गावातील काही ठिकाणी प्रार्थना सभा, आजार बरे करण्याचे आमिष, आर्थिक मदतीची आश्वासने, तसेच चमत्कार दाखविण्याच्या नावाखाली हिंदू समाजातील भोळ्या-भाबड्या नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः आजारी व्यक्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे व अडचणीत असलेल्या नागरिकांना या माध्यमातून आकर्षित करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक
उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
या कार्यक्रमांमध्ये “आजारी व्यक्ती बऱ्या होतील”, “आर्थिक संकटे दूर होतील”, “दैवी चमत्कार घडतील” अशा प्रकारची भ्रामक आश्वासने दिली जात असून, त्याद्वारे लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. अनेक वेळा या सभा गोपनीय पद्धतीने, रात्रीच्या वेळी किंवा खासगी ठिकाणी घेतल्या जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.
या प्रकारामुळे हिंदू समाजात तीव्र संतापाची भावना असून, गावातील नागरिक तसेचछावा क्रांतिवीर सेना रायगड जिल्हा प्रमुख रोशन महादेव पवार, जिल्हा सदस्य जयेंद्र मुंडे,शिरढोन गाव उपासरपंच वैभव मुकादम, ऋषिकेश भोईर, जनार्दन मुकादम, प्रमोद करणेकर, विनायक वाकडीकर, निलेश भोपी, मच्छिंद्र पवार, त्रिंबक म्हात्रे, सुश्रुत भोईर, विनोद ठकेकर, प्रज्योत पवार, निकेश भोमकर, अतिश मुकादम याबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. “धर्मांतरणास कोणाचाही विरोध नाही, मात्र दबाव, आमिष किंवा फसवणुकीच्या आधारे होणारे धर्मांतर हे कायद्याने व समाजाने मान्य करू शकत नाही,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कारवायांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.


Post a Comment
0 Comments