Type Here to Get Search Results !

संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी

संत रोहिदास जयंती मुंबई मध्ये उत्साहात साजरी

चर्मकार समाजाच्या आराध्य दैवत असलेल्या संत रोहिदास महाराजांच्या जयंती निमित्त राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.





मुंबई प्रतिनिधी -

 संत रोहिदास महाराजांचा जन्म १४५० मध्ये वाराणसीजवळील मांडूर गावात झाला होता. ते एक महान संत, कवी आणि समाजसुधारक होते. त्यांनी भक्ती चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि जातीभेदाविरुद्ध आवाज उठवला.

रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई. समाज कल्याण समिती आयोजित 

संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या६५०

वी जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात, समाजाचे नेते आमदार श्री. मंगेश कुडाळकर साहेब उपस्थित होते.

या जयंती शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री मयूर देवळेकर यांच्या शुभहस्ते रोहिदास यांच्या प्रतिमेला पुष्पकार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलन रोहिदास समाज पंचायत संघाचे उपाध्यक्ष श्री.गणेश चव्हाण, यांच्या समवेत माजी विश्वस्त श्री.विजय गोवळकर, संघ निवडणूक समिती अध्यक्ष श्री जगदीश जळगावकर,संघ चिटणीस संतोष गोठणकर, चिटणीस सूर्यकांत दाभोळकर,महिला संघटन समिती अध्यक्षा सौ. अश्विनी प्रभुलकर,  विभाग अध्यक्ष पंढीरकर हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात संघाचे उपाध्यक्ष श्री.गणेश चव्हाण,श्री. बळीराम सुसवीरकर,संघ निवडणूक समिती अध्यक्ष श्री जगदीश जळगावकर,यांनी कार्यक्रम मध्ये जयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या.


कुमारी. सलोनी मयूर देवळेकर हिने उपस्थित बांधवांना आपल्या मुला मुलीना,समाज कार्यात सहभागी होण्यासाठी  आव्हान करताना समाजाकडे नवतरुण नव्या  अपेक्षेने पहात आहे. त्यासाठी नवीन पिढीला व्यवसाय साठी आर्थिक मदत फुकट न देता माफक व्याजदर मध्ये करावी. 

वधू वर सूचक समितीच्या (वेबसाईट) संकेतस्थळाचे उद्घाटन* समाजाचे लाडके आमदार माननीय श्री मंगेश कुडाळकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक

 उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com





आमदार मंगेश कुडाळकर साहेब यांनी संत रोहिदास भवन साठी लागणारी सर्व मदत केली जाईल आणि ६५१ संत रोहिदास जयंती साजरी आपल्या संत रोहिदास भवनातील प्रशस्त सभागृहात करण्यात येईल.असे आश्वासन दिले.

अध्यक्ष श्री मयूर  देवळेकर यांनी  मनोगत व्यक्त करताना रोहिदास भवन बांधकाम बाबत माहिती दिली. संत रोहिदास भवनाचा लोकार्पण सोहळा २०२६ मध्ये भारताचे प्रंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल त्या साठी आर्थिक निधी कमी पडत असून समाजातील आर्थिक सक्षम बांधवांना मदती साठी आवाहन केले.मी शासकीय मदत मिळवण्यासाठी  मां. आमदार कुडाळकर साहेब यांच्या मदतीने प्रयत्न करीत आहे.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने , पंचायत पदाधिकारी,विभाग पदाधिकारी ,आजी माजी विश्वस्त महिला मंडळ उपस्थिती लक्षणीय होते.




संत रोहिदास महाराजांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये विविध समाज बांधव आणि राजकीय नेते सहभागी होत आहेत. या कार्यक्रमांमधून संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन समाज कल्याण समिती अध्यक्ष श्री. सुनील वायंगणकर यांनी केले.



Post a Comment

0 Comments