भांडुप गावात रामनवमी उत्साहात साजरी
🔶गुरूपादुका सोसायटीतील ४० ते ५० वर्ष जुन्या साई मंदिरात भजन, खेळ व विविध कार्यक्रमांचे आयोजन🔶
मुंबई प्रतिनिधी -
भांडुप गावात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. भांडुप गावातील श्री कृष्णा नगर,गुरूपादुका सोसायटी परिसरात असलेल्या सुमारे ५० वर्ष जुन्या साई मंदिरात प्रति वर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
राम नवमी उत्सवानिमित्त मंदिरात भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच लहान मुलांसाठी विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना परिसरातील नागरिक आणि महिला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मंदिरातील सर्व सभासद व स्वयंसेवक मोठ्या आनंदाने सेवा करताना दिसत होते. दर्शनासाठी आलेले भाविकही मोठ्या श्रद्धेने श्रीराम व साईबाबांचे दर्शन घेत होते.
अजय धामापूरकर, महेश मोरे, गौरव पंडित, संजय कांबळे, सचिन काशीद, बावा मोरे, जयेश बेंद्रे आदी भक्त गण मोठया भक्ती भावाने, आनंदाने सहभागी झाले होते.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारून गेला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीचा हा उत्सव आनंदात आणि उत्साहात पार पडला.




Post a Comment
0 Comments