Type Here to Get Search Results !

🔶जुगाराच्या साखळीमागे मोठे रॅकेट?



🔷उरण तालुक्यात नाईट क्रिकेटच्या आड जुगाराचा सुळसुळाट🔷


तरुणांना आमिष दाखवून आर्थिक फसवणूक





उरण, दि.२८ मार्च (वार्ताहर) : उरण तालुक्यात सध्या सुरू असलेल्या नाईट क्रिकेट स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर जुगाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. उरणमधील मोठी जुई, चिरनेर-भोम या भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत क्रिकेट सामने सुरू असून, हे सामने पाहण्यासाठी उरणसह नवी मुंबई, पनवेल आणि पेन तालुक्यातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

जाहिरात -

बलून डेकोरेश साठी संपर्क करा.



मात्र, या क्रिकेट स्पर्धांच्या आड काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जुगाराचे जाळे उभे केल्याचे दिसून येत आहे. सामने पाहण्यासाठी आलेल्या तरुणांना जुगाराचे आमिष दाखवून "जलद श्रीमंत होण्याचा" मोह निर्माण केला जात आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com




सुरुवातीला कमी पैशांत खेळायला लावून नंतर मोठ्या रकमेच्या सट्ट्याकडे वळवले जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. यामुळे अनेक तरुण आर्थिक अडचणीत सापडत असून काहीजण कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत.

 🔷जुगाराच्या साखळीमागे मोठे रॅकेट?

🔶प्रशासनाला ही खिशात ठेवल्याचा आरोप 🔷

 रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या प्रकारांमध्ये लाखो रुपयाची उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे काही ठिकाणी उघडपणे जुगार सुरू असूनही संबंधित यंत्रणांकडून कोणत्याही ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 यामागे मोठी साखळी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्थानिक नागरिक आणि काही खेळाडूंनी केलेल्या आरोपानुसार जुगार चालवणाऱ्यांचे जाळे व्यापक असून ते प्रशासनालाही खिशात घेऊन बिंदास्तपणे आपला धंदा चालवत आहेत.

स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करून अशा बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.



📞 संपर्क :

📧 Email : 

 uranshahar@gmail.com

mahaindia24@gmail.com

Post a Comment

0 Comments