Type Here to Get Search Results !

उरण मध्ये नाईट जुगाराचा सुळसुळाट – नागरिकांचा संताप उफाळला

 उरण मध्ये नाईट जुगाराचा सुळसुळाट – नागरिकांचा संताप उफाळला



उरण दि. २९  उरण शहरात सध्या नाईट जुगाराचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या जुगाराच्या अड्ड्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,

नाईट क्रिकेट सामान्यांचा नावाखाली जुगाराचा सुळसुळाट.

 शहरातील विविध भागांमध्ये खुलेआम क्रिकेट सामन्याचा नावाखाली जुगार खेळला जात असून मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होत आहे. या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com



स्थानिक नागरिक व पत्रकारांनी या प्रकरणावर आवाज उठवून ही प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्या चे चित्र दिसत आहे. 

“प्रशासन डोळे झाकून बसले आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.दरम्यान, महा इंडिया न्यूज पोर्टलने

स्थानिकांच्या तक्रारींच्या आधारे या प्रकरणाचा पाठपुरावा करत अनेकदा बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, तरीही संबंधितांवर कारवाई न होता उलट जुगार चालवणाऱ्या काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना संरक्षण दिले जात असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

चार ते पाच दिवस चालणारे हे क्रिकेट सामन्या त लाखो रुपयाची उलाढाल होताना दिसत आहे. 

🔶 महाराष्ट्र सरकार उरणचा तरुणांना भिकेला लावणार? 🔶

 असा सवाल नागरिक करत आहे, या वाढत्या जुगार संस्कृतीमुळे तरुण पिढी वाममार्गाला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांतच शेकडो  तरुण या विळख्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात असून याचे गंभीर सामाजिक परिणाम होऊ शकतात, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला असून तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. संबंधित यंत्रणांनी वेळीच हस्तक्षेप करून जुगार अड्डे बंद करावेत, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.

(या प्रकरणी पुढील घडामोडींवर आमचे लक्ष असून अधिक माहिती लवकरच...)

Post a Comment

0 Comments