Type Here to Get Search Results !

घार हिंडे आकाशी तिचे लक्ष पिलांपाशी : महेंद्रशेठ घरत

 

घार हिंडे आकाशी तिचे लक्ष पिलांपाशी : महेंद्रशेठ घरत




शेलघरमध्ये २१ बाईकच्या एमजी ट्राफीचे झोकात उदघाटन 


नवी मुंबई उलवे, ता. २८  : "माझ्या जडणघडणीत माझ्या शेलघर गावाचा मोलाचा वाटा आहे. एकेकाळचे शेलघर आणि आताचे शेलघर यात जमीन आस्मानाचा फरक आहे. आज माझे शेलघर गाव महाराष्ट्राच्या नकाशात सुनियोजित, स्वच्छ आणि बंगल्यांचे गाव म्हणून उदयास आले आहे. त्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली आणि अनेकांच्या विरोधालाही सामोरे जावे लागले; परंतु मी हार मानली नाही. म्हणूनच आजचे शेलघर सर्व सुविधांनी दिमाखात उभे आहे.




 त्यामुळे शेलघरचे नाव मोठे होण्यासाठी सर्वकाही करायला मी तयार आहे. त्यामुळेच गावातील युवकांनी माझ्याकडे २१ बाईकची प्रकाशझोतातील सामन्यांची कल्पना मांडली. त्याला मी लगेच होकार दिला. कारण आपले गाव हे गावच असते, तेथील आया-बहिणींची माया, प्रेम ही आपली शिदोरी असते. त्यामुळे त्या शिदोरीला विसरून चालणार नाही. शेवटी ग्रामस्थांच्या खांद्यावरूनच शेवटचा प्रवास आपल्याला करायचा असतो, याची मला जाणीव आहे. मी जरी आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करीत असलो तरी परदेशात असतानाही माझे गावाकडे बारीक लक्ष असते. 


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com




'घार हिंडे आकाशी तिचे लक्ष पिलांपाशी', अशी माझी अवस्था गावाबाबतीत होते. त्यामुळेच मी गावातील प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होतोच. एमजी ट्राफीचे भव्य आयोजन करून तरुणांनी निश्चितच खेळाडूंना उत्तम संधी दिली आहे. त्याबद्दल सर्व तरुणांचे अभिनंदन, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत एमजी ट्राफीच्या उदघाटनप्रसंगी म्हणाले. त्यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २७) रात्री झोकात उदघाटन झाले. यावेळी बॅंजो पथकाच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत महेंद्रशेठ घरत आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.    


यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था आणि महेश स्पोर्टस शेलघर यांच्या वतीने शेलघरमध्ये शुक्रवारपासून एमजी ट्राफीचे आयोजन करण्यात आले आहे. २७ मार्च ते १ एप्रिलदरम्यान हे प्रकाशझोतातील टेनिस सामने होतील. सुमारे ५० संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे खेळाडूंना चक्क २१ बाईक जिंकण्याची अपूर्व संधी मिळणार आहे. त्यामुळे स्पर्धेची रंगत वाढली आहे. २१ बाईकचा रणसंग्राम पाहण्यासाठी क्रिकेट रसिक मोठ्या प्रमाणात हजर होते. त्यामुळे विजेत्या संघाच्या खेळाडूंची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, अॅड. अविनाश ठाकूर, उद्योजक कुणाल घरत, गुलाबशेठ घरत, श्रीकांत घरत, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, कॉंग्रेसचे हेमराज म्हात्रे, निखिल ढवळे, देविदास म्हात्रे आणि एमजी ग्रुपचे सहकारी उपस्थित होते.


जाहिरात -

बलून डेकोरेश साठी संपर्क करा.

Post a Comment

0 Comments