नाव्हा शेवा ट्राफिक पोलीस चौकीसमोर असलेल्या कंटेनर टेलर ला आग; jnpt बंदर परिसरात खळबळ
उरण, दि. २६ : उरण तालुक्यातील jnpt बंदर परिसरात आज दुपारच्या २:३० सुमारास नव्हाशेव्हा ट्राफिक पोलीस चौकीसमोर (चांदणी चौक ) उभ्या असलेल्या एका 40ft टेलर च्या ड्रायव्हर केबिन ला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, jnpt बंदरातील नाव्हा शेव्हा ट्राफिक पोलीस चौकीसमोर उभ्या असलेल्या ड्रायव्हर केबिन मधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते,आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंटेनरमध्ये कोणता माल होता याचीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
आग पूर्णपणे विझल्यानंतरच पंचनामा व पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
स्थानिक नागरिकांनी मात्र बंदर परिसरात वाढत्या कंटेनर वाहतुकीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Post a Comment
0 Comments