Type Here to Get Search Results !

उरण नगरपरिषद तिजोरी लुटणारे तीन वीर कोणाच्या छात्रछायेखाली खाली? गरीब विक्रेत्यांकडून वसुली, लाखोच्या पैसा कोणाच्या खिशात?

 " नगर परिषद  तिजोरी लुटणारे ‘तीन वीर’ कोणाच्या आशीर्वादाने?; महिन्याला लाखोंची वसुली, पण पालिकेत जमा फक्त तुटपुंजी रक्कम!"



" उरण नगरपरिषद  वसुली घोटाळ्यांचा भांडाफोड लाखोंचा पैसा कोणाच्या आशीर्वादाने गायब?"


उरण : उरण नगरपरिषदेतील हातगाडी, भाजी व मच्छी विक्रेत्यांकडून होणाऱ्या वसुलीत मोठा आर्थिक घोटाळा सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश बालचंद्र ठाकूर यांनी केला आहे. नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनातून त्यांनी पालिकेच्या महसूल व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले असून, "नगरपरिषदेची तिजोरी लुटण्याचा परवाना काही कर्मचाऱ्यांना दिला आहे का?" असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.


उरण शहरातील सुमारे ७०० ते ८०० हातगाडी, स्टॉल, भाजी व मच्छी विक्रेत्यांकडून दररोज सकाळी २० रुपये आणि संध्याकाळी २० रुपये, असे प्रत्येकी ४० रुपये वसूल केले जातात. या हिशोबाने दररोज किमान २८ ते ३२ हजार रुपयांची वसुली अपेक्षित असताना पालिकेच्या तिजोरीत मात्र अवघे ४,५०० ते ५,००० रुपयेच जमा होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.


याहून धक्कादायक बाब म्हणजे ही वसुली करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांच्या पगारावर पालिका वर्षाकाठी तब्बल २९ लाख रुपये खर्च करत आहे, तर त्यांच्या माध्यमातून पालिकेत जमा होणारी वार्षिक रक्कम फक्त १८ लाख रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. म्हणजेच पालिकेला दरवर्षी सुमारे ११ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.


मनसेच्या म्हणण्यानुसार, "पगार लाखाचा आणि वसुली हजारांची" अशी परिस्थिती उरण पालिकेत निर्माण झाली आहे. सामान्य विक्रेत्यांकडून पैसे घेतले जातात, मात्र अनेकदा पावती दिली जात नसल्याची तक्रारही समोर येत आहे. त्यामुळे वसूल झालेला पैसा नेमका पालिकेच्या खात्यात जातो की कुणाच्या खिशात, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच 

महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com

सचिन काजरोळकर




संदेश ठाकूर यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे. तसेच वसुली प्रक्रिया ठेका पद्धतीने किंवा एका प्रामाणिक कर्मचाऱ्यामार्फत राबविण्याची सूचना केली आहे. "तीन कर्मचाऱ्यांवर लाखो रुपये खर्च करूनही महसूल वाढत नसेल, तर यामागे केवळ निष्काळजीपणा नसून मोठे आर्थिक गणित दडलेले असू शकते," असा संशयही त्यांनी व्यक्त केला.


दरम्यान, या आरोपांमुळे उरण नगरपरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नगराध्यक्ष व प्रशासन यावर काय भूमिका घेतात, दोषींवर कारवाई होते की नेहमीप्रमाणे प्रकरण दडपले जाते, याकडे संपूर्ण उरणकरांचे लक्ष लागले आहे.

 सकाळी झोपेतून उठूनच  स्थानिक मच्छी विकणाऱ्या महिलांकडून  अगदी सकाळी सात, आठ वाजल्या पासुन पावती फाडली जाते असा आरोप स्थानिक करत आहेत,त्यात पण कर्मचारी दारू पिऊन पावती फडताना दिसनू येतो मघ हा..


"वसुलीचा पैसा कुठे जातो? पालिकेची तिजोरी रिकामी आणि काहींची तिजोरी भरतेय का?" हा प्रश्न आता उरणच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाला आहे. ह्या वसुलीत उरण उरण नगर परिषदेमध्ये कोण कोणते मोठे अधिकाऱ्यांचा हात आहे हेही समोर येईल याकडे उरणकरांचे लक्ष लागून आहे.

Post a Comment

0 Comments