Type Here to Get Search Results !

द्रोणागिरी नोडमधील अनधिकृत मंगळवार बाजारामुळे घाणीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात?


द्रोणागिरी नोडमधील अनधिकृत मंगळवार बाजारामुळे घाणीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात?






उरण, दि. २९ (प्रविण पाटील): नवी मुंबईतील सिडकोने विकसित केलेल्या द्रोणागिरी नोड परिसरात दर मंगळवारी भरत असलेल्या कथित अनधिकृत साप्ताहिक बाजारामुळे परिसरात वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि दुर्गंधीची समस्या निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, द्रोणागिरी वसाहतीतील मुख्य रस्त्यावर दर मंगळवारी सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा बाजार भरतो. बाजारामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, बाजार संपल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचतो. त्यामुळे दुर्गंधी पसरून परिसराचे आरोग्यदायी वातावरण बिघडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

परिसरातील काही नागरिकांनी ताप, खोकला तसेच डेंग्यूसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली असून, बाजारानंतर तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची आणि सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्याची मागणी केली आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच 

महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com




द्रोणागिरीतील रहिवाशांनी हा अनधिकृत बाजार तातडीने बंद करावा किंवा नियोजित जागी स्थलांतरित करावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच संबंधित प्रशासनाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला असून, याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments