Type Here to Get Search Results !

नवीन शेव्यात घराचा स्लॅब कोसळून तिघे गंभीर;

 


४० वर्षांच्या प्रशासकीय दिरंगाईचा स्फोट! नवीन शेव्यात घराचा स्लॅब कोसळून तिघे गंभीर; 'ही नैसर्गिक नव्हे, प्रशासननिर्मित दुर्घटना' असा ग्रामस्थांचा आरोप.





पुनर्वसन रखडले, जमिनींचे हक्क प्रलंबित, बँकांकडून कर्ज नाकारले; जीव धोक्यात घालणाऱ्या व्यवस्थेविरोधात ग्रामस्थांचा संताप.



उरण, दि. १७ (विठ्ठल ममताबादे):उरण तालुक्यातील मौजे नवीन शेवा येथे एका घराचा स्लॅब अचानक कोसळून तीन जण गंभीर जखमी झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने केवळ एका कुटुंबावर संकट कोसळले नसून, गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन प्रश्नावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ही केवळ अपघाती घटना नसून, प्रशासनाच्या दीर्घकालीन दुर्लक्षाची आणि निष्क्रियतेची परिणती आहे, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

जेएनपीटी (JNPT) प्रकल्पासाठी नवीन शेवा येथील भूमिपुत्रांनी विकासाच्या नावाखाली आपल्या जमिनी शासनाला दिल्या. त्याबदल्यात सुरक्षित पुनर्वसन आणि कायमस्वरूपी निवासाची हमी मिळणे अपेक्षित होते. मात्र, ४० वर्षांनंतरही पुनर्वसनाचा प्रश्न धुळखात पडलेला असून, अनेक कुटुंबे आजही जीव मुठीत धरून मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहण्यास भाग पडली आहेत, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या जागांवर पक्की घरे उभारण्यास परवानगी नाही. परिणामी, चार दशकांपूर्वी उभारलेली घरे आज जीर्ण, धोकादायक आणि वाळवीग्रस्त झाली आहेत. अनेक वेळा प्रशासनाला या धोक्याची जाणीव करून देऊनही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुनर्वसनाची जमीन अद्याप संबंधितांच्या नावावर करण्यात आलेली नसल्याने सातबारा उताऱ्यावर हक्क मिळालेला नाही. त्यामुळे घरांच्या दुरुस्तीसाठी किंवा नवीन घर उभारण्यासाठी बँकांकडे कर्ज मागितल्यास "जमीन नावावर नाही" या कारणावरून कर्ज नाकारले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना स्वतःच्या घराच्या सुरक्षेसाठीही आर्थिक मदत मिळत नसल्याची शोकांतिका निर्माण झाली आहे.

ग्रामस्थांच्या आरोपानुसार, वारंवार निवेदने, अर्ज, पाठपुरावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनंतरही तहसील कार्यालयाकडून प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्यात आली नाही. वेळेत पुनर्वसन पूर्ण झाले असते किंवा जमिनींची नोंद संबंधितांच्या नावावर झाली असती, तर संबंधित कुटुंबाला कर्ज मिळून सुरक्षित घर उभारणे शक्य झाले असते आणि ही दुर्घटना टाळता आली असती, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

या घटनेनंतर नवीन शेवा परिसरात संतापाची लाट उसळली असून, जखमींना तातडीने आर्थिक मदत, मोफत व दर्जेदार वैद्यकीय उपचार आणि संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पुनर्वसन, सातबारा हक्क आणि सुरक्षित निवासाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच 

महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com

सचिन काजरोळकर



"आता आश्वासनांची नव्हे, निर्णयाची वेळ आली आहे. प्रशासनाने तात्काळ पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढला नाही, तर नवीन शेवा ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनावर असेल," असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.





दिनांक १६/०७/२०२६ रोजी पहाटे साधारणतः ६.०० वाजताची घटना आहे 

या ठिगाऱ्या खाली एक  ८ -१० वर्षाचा लहान मुलगा, त्याची आई आणि वडील असे तिघेजण झोपेतच असताना अडकले.

तिघांनाही इजा झाली असून त्यांच्यावर एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे उपचार सुरु आहेत.

घटना स्थळी शेजारील ग्रामस्थ येऊन मदतकार्य सुरू केले होते यापैकी कोणीतरी फायर ब्रिगेड ला फोन करून अपघाताची बातमी दिली असता थोड्याच वेळात ते आले आणि त्यांनी आई आणि वडील यांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढले. त्यापूर्वी ग्रामस्थानी लहान मुलाला बाहेर काढले होते.

Post a Comment

0 Comments