वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा; उरणच्या रहिवाशांचा महावितरणाविरोधात संताप
उरण मध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित; रहिवाशांचा महावितरणाविरोधात संताप
उरण दि.23 (प्रतिनिधी ): उरण शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास वीज गेल्यानंतर ती मध्यरात्री उशिरा येते, तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ६ वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडित होऊन अनेक तास वीज नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
या सततच्या वीजखंडितामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचे हाल होत असून, पाणीपुरवठा, घरगुती उपकरणे आणि दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा वायरमनला फोन करूनही तो फोन उचलत नाही. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर "लाईट जातच नाही" असे सांगून तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर तक्रार करूनही घटनास्थळी कर्मचारी किंवा वायरमन पाठवला जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.
"शहरातच अशी परिस्थिती असेल, तर ग्रामीण भागातील नागरिकांची अवस्था काय असेल?"
असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून ही समस्या कायम असूनही प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
"मुसळधार पाऊस नसताना देखील महावितरणचा वीजपुरवठा वारंवार का खंडित होतो?"
महावितरणने या समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करावी, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचे मूळ कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करावी आणि नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.
महावितरणची भूमिका :
या संदर्भात महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागरिकांनी केलेल्या तक्रारींबाबत त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल. दरम्यान, संबंधित विभागाने कोटनाका येथील ओमकार अपार्टमेंट परिसरातील वीजपुरवठ्याची तातडीने तपासणी करून वारंवार होणाऱ्या बिघाडाचे कारण स्पष्ट करावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment
0 Comments