Type Here to Get Search Results !

खासदार सुनील तटकरे यांच्या दौऱ्यामुळे करंजा जेट्टी चकाचक; पण मच्छीमारांच्या डिझेल दरवाढीचा मुख्य प्रश्न सुटणार का?

 खासदार सुनील तटकरे यांच्या दौऱ्यामुळे करंजा जेट्टी चकाचक; पण मच्छीमारांच्या डिझेल दरवाढीचा मुख्य प्रश्न सुटणार का?




दि २१ उरण (प्रविण पाटील)

रायगडचे खासदार आणि देशाच्या पेट्रोलियम समितीचे अध्यक्ष श्री. सुनील तटकरे आज करंजा येथील ओएनजीसी (ONGC) कंपनीला भेट देण्यासाठी दिनांक  २१ ऑगस्ट रोजी आले आहेत .या दौऱ्यानिमित्त करंजा जेट्टी येथे त्यांचे ब्रास बँडच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र, या हायप्रोफाइल दौऱ्यामुळे स्थानिक प्रवासी आणि मच्छीमारांना एका वेगळ्याच सुखाचा अनुभव आला; तो म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याच्या विळख्यात अडकलेली करंजा जेट्टी अचानक चकाचक झाली! 


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच 

महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com

सचिन काजरोळकर




     रेवस ते करंजा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून जेट्टीवरील अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता. जेट्टीवर पडलेले बोटिंगचे अवशेष, जुना कचरा आणि इतर आडगळ यामुळे प्रवाशांना ये-जा करणे कठीण झाले होते. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी वारंवार मेरिटाईम बोर्ड व संबंधित विभागाकडे ही आडगळ हटवण्याची मागणी केली होती, परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात होते. आज खासदार सुनील तटकरे येणार म्हणून प्रशासनाने तातडीने हालचाली करत संपूर्ण जेट्टी परिसराची स्वच्छता केली. तटकरेंच्या दौऱ्यामुळे का होईना, प्रवाशांना अखेर स्वच्छ जेट्टीवरून प्रवास करायला मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले, तर दुसरीकडे प्रशासकीय दिरंगाईबद्दल संतापही व्यक्त होत आहे.

 



     खासदार तटकरे हे ओएनजीसी कंपनीला भेट देणार असल्याने स्थानिक मच्छीमार बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने कोकणातील मच्छीमारांना शेतीचा दर्जा दिला असला, तरी प्रत्यक्षात मात्र मच्छीमराणा डिझेल खरेदी करताना कंजूमर व्यावसायिक दराने तब्बल 130 रुपये प्रति लिटर या दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे डिझेलचे गगनचुंगी दर आणि त्यातच मच्छीमारी व्यवसायातील इतर संकटामुळे कोकणातील मच्छीमार समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे. 




   सुनील तटकरे ही देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा पेट्रोलियम समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांच्याकडे मोठी ताकद आहे त्यामुळे त्यांनी या दौऱ्याच्या निमित्ताने देशाच्या केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्याची तातडीने भेट घ्यावी आणि मच्छीमारांच्या ज्वलंत समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढून त्यांना दिलासा द्यावा अशी तीव्र मागणी करंज्या सह संपूर्ण कोकणातील मच्छीमार समाजाकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments