भेंडखळ ग्रामपंचायतचा वतीने जेष्ठ नागरिक चा सन्मान.
दि.२५ उरण (प्रविण पाटील)
उरण तालुक्यातील श्रीमंत असलेली भेंडखळ ग्रामपंचायतचा वतीने श्रावण महिन्याचा औचित्य साधून सोमवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता भेंडखळ गावातील ३०० महिला आणि पुरुष जेष्ठ नागरिकांना बॅलेक्ट भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
दरवर्षी भेंडखळ ग्रामपंचायतचा वतीने विधवा महिलाचा सन्मान, दिव्यांगाचा सन्मान, आरोग्य तपासणी,रक्तदान शिबीर, दहावी, बारावी ,पदवीधर चा सत्कार आणि उच्च शिक्षिताचा सन्मान ,वृक्षारोपण असे अनेक उपक्रम राबविण्यात भेंडखळ ग्रामपंचायत अग्रेसर असते.
दिनांक २४ ऑगस्ट रोजी ३०० जेष्ठ नागरिकांना बॅलेक्ट भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
सदर प्रसंगी भेंडखळ ग्रामपंचायतील सरपंच सौ. मंजिता पाटील ,उपसरपंच सौ. सोनाली ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य श्री. लिलेश्वर भगत ,श्री. दिपक ठाकूर, श्री.अभिजीत ठाकूर, सौ.स्वाती घरत,सौ.स्वाती पाटील, सौ.शितल ठाकूर, प्राची पाटील, सौ.अक्षता ठाकूर सौ.संगीता भगत, तसेच ग्रामविकास अधिकारी श्री.सुरेश मोहिते. ग्रामपंचायत कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका महिला मंडळ उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments