Type Here to Get Search Results !

वारसाहक्काने नोकरी मिळवुन दिल्याबद्दल म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचा वतीने मा.आयुक्त तथा अभिषेक कृष्णा साहेब, मा.उपायुक्त श्री.शांताराम गोसावी आणि कक्ष अधिकारी श्री.संदिप बिरंगळे यांचा सत्कार.

 वारसाहक्काने नोकरी मिळवुन दिल्याबद्दल म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचा  वतीने मा.आयुक्त तथा अभिषेक कृष्णा साहेब, मा.उपायुक्त श्री.शांताराम गोसावी आणि कक्ष अधिकारी श्री.संदिप बिरंगळे यांचा सत्कार. 





दि.२५ उरण वार्ताहर _प्रविण पाटील

 म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्या वतीने उरण सह राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायती मधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळवून दिल्याबद्दल मा. आयुक्त तथा संचालक सन्मा. श्री. अभिषेक कृष्णा* साहेबांचा मा. उपायुक्त श्री शांताराम गोसावी आणि कक्ष अधिकारी श्री संदीप बिरंगळे यांचा सत्कार दिनांक २५ ऑगस्ट  रोजी सी.बी.डी.बेलापूर  नवीमुंबई येथे करण्यात आला.


विठ्ठू माऊलीची मूर्ती देऊन युनियनचे कार्याध्यक्ष कामगार नेते श्री. संतोष पवार आणि सरचिटणीस कामगार नेते श्री. अनिल जाधव, खजिनदार श्री. दत्तगुरु म्हात्रे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी कामगार नेते संतोष पवार आणि अनिल जाधव यांनी मा. आयुक्त तथा संचालक श्री. अभिषेक कृष्णा यांच्याकडे राज्यातील कामगार-कर्मचाऱ्यांच्या खालील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आणि महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती समवेत तातडीने आढावा बैठक आयोजित करण्याची मागणी केली.

चर्चा झालेले प्रमुख प्रलंबित विषय :


1) ग्रामपंचायत कालीन कर्मचाऱ्यांचे समायोजन :- राज्यातील पूर्वाश्रमीचे ग्रामपंचायत कालीन कायम कर्मचाऱ्यांचे जवळपास 10 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपंचायतीमधील समावेशाचा विषय. या संदर्भात वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनाकडे पाठविणेबाबत मागणी करण्यात आली.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच 

महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com

सचिन काजरोळकर



2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना :- 2008 पासून सुरू असलेली ही योजना केवळ कागदावरच राहिली असून, राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायती मधील एकाही सफाई कामगाराला या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.

3) क्रीडा महोत्सव पुन्हा सुरू करणेबाबत :- राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील २४ तास अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्ट्रेस फ्री जीवन जगण्यासाठी आणि नवचैतन्य निर्माण करण्यासाठी तत्कालीन सन्माननीय श्री. मनोज रानडे, आयुक्त तथा संचालक यांनी सुरू केलेला राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.




४) स्वच्छता निरीक्षक यांचे समावेशन :-- शासनाने मागविल्या प्रमाणे वस्तुस्थिती दर्शक अहवाल पाठविण्याचे काम सुरू असलेबाबत माहीती संबंधित अधिकारी यांनी दिली.

मा. आयुक्त साहेबांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेऊन, लवकरच संघर्ष समिती समवेत सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments