Type Here to Get Search Results !

सिडकोचे माजी अधिकारीच श्री. कमलाकर फंड हेच देत आहेत चाणजे विभागात माळीण व तळई सारख्या दुर्घटनेसारख्या पुनरावृत्तीस निमंत्रण.

 सिडकोचे माजी अधिकारीच श्री. कमलाकर फंड हेच देत आहेत चाणजे विभागात माळीण व तळई सारख्या दुर्घटनेसारख्या पुनरावृत्तीस निमंत्रण.




उरण (प्रतिनिधी)

गेल्या काही दिवसात माळीण व तळई गावात जी परिस्थिती आली होती ती नैसर्गिक .परंतु मानवनिर्मित परिस्थिती आत्ता चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील गावांवर येताना दिसत आहे. याचे मुख्यकारण द्रोणागिरी डोंगर परिसरात होणारे अवैध्य माती उत्खनन आणि बेसुमार वृक्षतोड.


द्रोणागिरी डोंगरात अनेक सरकारी अधिकारी, परप्रातीय ठेकेदार, बिल्डर यांनी स्थानिक दलालांना हाताशी धरून जागा विकत घेतल्या आहेत. आणि ह्याच जागा स्थानिक दलालांना पुढे करून प्लॉटिंग करून विक्री करत आहेत. सदर जागेचे प्लॉटिंग करताना म्हणजेच सपाटीकरण करताना अवैधपणे वनखात्याच्या अख्यारीत वृक्षांची तोड, आणि पाण्याचे नैसर्गिक ओहोळ बुजवणे असे प्रकार केलेले आहेत.

द्रोणागिरी डोंगर चाणजे ग्रामस्थांसाठी अनेक वर्षांपासून संरक्षक भिंत म्हणून काम करत आहे. आणि हि भिंत तोडून ग्रामस्थांना मरणाच्या दारात लोटण्याचा जणू सरकारी अधिकारी, परप्रातीय ठेकेदार, बिल्डर यांनी स्थानिक दलालांनी विडाच उचलला आहे.सीडको अधिकारी कमलाकर फंड यांनी केलेल्या अवैध्य माती उत्खननामुळे पावसाळी पाणी वाहून नेणारे नैसर्गिक प्रवाह बदललेत त्यामुळे गावातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.

त्यांच्यापैकी एक प्रकार म्हणजे सिडकोचे माजी अधिकारी कमलाकर फंड ह्यांनी केलेला आहे. सदर प्लॉटिंग करताना द्रोणागिरी डोंगराला उभ्या २० ते ३० फूट या अंतरावर कापलेले आहे. ह्याच प्लॉटिंग ला विरोध करत असताना वनखाते, तहसील कार्यलय येथे तक्रार केली असता खाजगी जागेत कोणीही काहीही करू शकतो तसेच वनखात्यायतील वृक्षांची कोणीही कत्तल केली नाही अशी उडवा उडवीची उत्तरे सरकारी अधिकाऱ्यांकडून दिली गेली. स्थानिक लोकांनी गरजेपोटी किव्वा काही सकारत्मक कारणाने एकाद्या झाडाची फांदी जरी तोडली त्याच्यावर त्वरित कार्यदेशीर कार्यवाही करण्यासाठी दक्ष वनखाते ह्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर उदार का आहे तेच कळत नाही ?

कि तो केवळ एक सरकारी अधिकारी आहे म्हणून, सिडकोचा अधिकारी आणि नंतर मंत्रालयात काम करतो म्हणून, कि ह्यांचे काही आर्थिक लागेबांधे आहेत म्हणून ?अशा चर्चेला उधाण आल्याचे चित्र उरण तालुक्यात एकायला मिळत आहे.



 

 आज सुरक्षेच्या कारणास्तव वनखात्याने द्रोणगिरी किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग बंद केला आहे, पण अनेक वर्षापासून किल्ल्याच्या पायथ्याशी अवैधपणे चालु असलेले माती उत्खनन, वृक्षतोड याकडे वनखात्याची डोळेझाक का?

माळीण, तळई अश्या घटना ताज्या असताना द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी माती उत्खनन करून प्लॉटिंग करून वरील घटनांची 

पुनरावृत्ती करुन प्लॉट धारका ना मृतू च्या खाईत ढकलण्या सारखे आहे

  सुमीत थळी अध्यक्ष -आगरी कोळी संघटना चाणजे विभाग


चाणजे ग्रामपंचायत हद्दीमध्ये द्रोणागिरी माती उतखलनाचे जे काम चालू आहे त्यास चाणजे ग्रामपंचायत ने कोणत्याही प्रकारे परवानगी देण्यात आली नाही ह्या चालू माती उत्ख्नाने उद्या जर तळइ व मालिन गावावर जी परिस्थिती तशी परिस्थिती येऊ नये.या दृष्टी ने महसूल खात्याने दक्षता घ्यावी

      सरपंच 

श्रे मंगेश थळी

Post a Comment

0 Comments