अरे नालायक युद्ध खोरांनो! , राजकारण्यांनो,
संपादक_ वसंत माने (उरण शहर)
🔶नेपाळ चा प्रलय त्याचे संकेत आहेत,विश्वविनाश जवळ आलाय 🔶
☘️ब्रम्हमुहुर्तावर
बोलु काही...
🙏भारतीय ॠशीमुनी, आजचे जगभरातील शास्त्रज्ञ, पर्यावरणविषयक अभ्यासक, जगाचं भविष्य वर्तविणारे जगविख्यात नास्टाॅदामस असो कींव्वा आमचे सर्व वेद पुराण . साऱ्यांचे अंदाज जुळुन आलेत, जगाचा विनाश आता अगदीच जवळ आलाय .
अर्थात तो युद्धातून होईल की नैसर्गीक आपत्तीतुन हे काळच ठरवेल पण आपणाकडे नेहमीच्या धकाधकीत वेळ मीळाला तर थोडं शांतपणे या बाबद विचारमंथन व्हावं, आम्ही ते ब्रम्हमुहुर्तावर करून ब्रम्हांडाची स्थीती आणि प्रूथ्वी वरील मानव संस्कृती जी युगायुगात कशी नष्ट होते आणि ति वेळ आता फार दुर नाही हे संदर्भातील उदाहरणासह सांगण्या साठीच हा प्रयत्न करत आहोत.
स्वार्थी, सत्तापिपासु सत्तेसाठी सत्य धर्माचं आचरण सोडुन वागणारे जागतीक दर्जाचे नेते यांनी आता तरी जागं होणं गरजेचं आहे .
कसले अणूबाॅम्ब? कसली क्षेपणास्त्र? कसला येवढा माज?
अरे नालायक युद्ध खोरांनो! तुमचा बाप आमच्या कैलासात जागा झालाय, नेपाळ चा प्रलय त्याचे संकेत आहे विश्वविनाश जवळ आलाय. अरे! नालायक युद्धखोरानो, युद्ध कसलं करताय?
हिमालय कोसळतोय, कैलास जागा झालाय, हे महायुद्ध थांबवा. अन्यथा जगाचा सर्वनाशच अटळ आहे.
सध्या जगात अनेक ठीकाणी महायुद्धाची नांदी सुरू झाली आहे मात्र भविष्यात लीहुन ठेवलेल्या विश्वविनाशाची कुणाला कल्पनाच नाही, कींव्वा त्यावर विश्वास नाही. मोठमोठी क्षेपणास्त्र मारत सुरू असलेल्या युद्धाच्या विनाशाची दाहकता माणसाला निसर्गाच्या महाकाय शक्तींपेक्षा मोठी वाटू लागली आहे, पण ही विसरून चालणार नाही की, आपण ज्या पृथ्वीवर जगत आहोत, तीच आपल्या अस्तित्वाचा एकमेव आधार आहे. अणुबॉम्बचे साठे आणि युद्धाची नको असलेली स्पर्धा कोणत्याही देशाचे भले करू शकत नाही, उलट सर्वनाशच ओढवून आणतील. मानवाने निसर्गाच्या नियमांशी खेळणं थांबवलं पाहिजे आणि आपल्यातील मतभेद दूर करून पृथ्वीच्या रक्षणासाठी एकत्र आलं पाहिजे, कारण तिचा विनाश आता आपल्याच अती लोभा पाई आणी विकासा मुळे जवळ आलाय.
अलिकडेच नेपाळमध्ये आलेला महापूर एक मोठ्या महाप्रलयाचा ट्रेलर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.निसर्गाचा तो इशारा आहे, जो हिमालयात म्हणजेच कैलासातुन दीला जातोय. तो भयानक प्रसंग तेथील परिसरातील देवांच्या क्रोधाची आणि निसर्गातील अस्थिरतेची जाणीव करून देतो आहे. हिमनद्यांचे वितळणे आणि अचानक होणारे भूस्खलन यामुळेच अशा भीषण पूरपरिस्थिती निर्माण होत आहेत ज्याचा थेट फटका मानवी जीवनाला आणि शहरांना बसतोय.
हे सारं अगदी अचानक आणि सहज झालय असं नाही म्हणता येत, कलीयुगातील कली च्या प्रगटीकरणाची कदाचित ती सुरवात असेल. यावर खुप लीहावसं वाटत पण तुमच्या कडे तेवढा वेळ नसेल, म्हणुन ' भविष्य मालीका पुराण , ईथे क्लीक करा आणि ' कलीयुग की बारा प्रमुख भविष्यवाणी कींव्वा ' कली अवतार अॅन्ड कलीयुग, असे टाईप करा आणि प्रृथ्विच्या विनाशाचं वास्तव समजुन घ्या. परमेश्वरावर विश्वास ठेवतांना? मग त्याच्या साठी तरी येवढ नकीच पहा.
🔶यावरच असेल आमचा पुढचा लक्षवेधी अर्थात ' जगाचा विनाश आणि तिरूपति नाथांच्या नेपाळ चा प्रलय 🔶
☘️ वसंत माने/उरण शहर संपादक.



Post a Comment
0 Comments