उरण JNPT परिसर पुन्हा रक्तरंजित; आणखी एक अपघात, वाहतूक व्यवस्थेवर नागरिकांचा संताप
उरण दि. ०३ ऑगस्ट प्रतिनिधी
उरण शहरातील JNPT, PUB बिल्डिंग ते करळ फाटा हा रस्ता अपघातांचा हॉटस्पॉट बनला असून, आज दुपारच्या २:५० ते ३:०० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाला भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, तरुण जागीच बेशुद्ध पडला. अपघातानंतर काही काळ जखमी तरुणाला तातडीची मदत मिळाली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, PUB बिल्डिंग ते करळ फाटा या मार्गावर दर महिन्याला सुमारे १५ ते २० अपघात घडत आहेत. मात्र, वारंवार अपघात होऊनही वाहतूक नियंत्रणासाठी कोणतेही प्रभावी उपाय करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
या अपघातानंतर पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. "या परिसरात वाहतूक पोलीस नेमके करतात तरी काय?" असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. अपघातानंतर दोष कोणाचा हा तपासाचा विषय असला, तरी वारंवार होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यात प्रशासन आणि वाहतूक विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महा इंडिया न्यूजने या परिसरातील धोकादायक परिस्थितीवर यापूर्वीही अनेक वेळा आवाज उठवला आहे. "आंधळा CCTV", वाहतूक कोंडी, अपघातांची मालिका आणि सुरक्षेतील त्रुटी यासंदर्भात अनेक बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही.
आता तरी संबंधित प्रशासन, वाहतूक पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करून या "मृत्यूच्या सापळ्या"त रूपांतरित झालेल्या रस्त्यावरील अपघातांची मालिका थांबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



Post a Comment
0 Comments