Type Here to Get Search Results !

कोटनाका-बलाई रस्त्यावरील गटार ठरतेय धोकादायक महिला व ज्येष्ठ नागरिकांचा जीव मुठीत; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका

उरण कोटनाका-बलाई रस्त्यावरील गटार ठरतेय धोकादायक
महिला व ज्येष्ठ नागरिकांचा जीव मुठीत; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका





उरण, दि. ८ (प्रतिनिधी) – उरण कोटनाका ते बलाई तसेच बलाई ते कोटनाका (बँक ऑफ इंडिया  समोरचा रस्ता) या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सध्या एका धोकादायक गटारामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.
या रस्त्यावर सुमारे दोन फुटांचे गटार बांधण्यात आले असून, ते रस्त्याच्या वळणावरच अत्यंत उंच पद्धतीने तयार करण्यात आले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना विशेषतः स्कूटी चालविताना मोठी कसरत करावी लागते. या गटारावरून दुचाकी नेताना अनेक महिला व ज्येष्ठ नागरिक घसरून पडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्त्यावरून स्थानिक तरुणांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र, या धोकादायक ठिकाणाबाबत अद्याप ठोस तक्रार अथवा पाठपुरावा होत नसल्याने प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.



महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा गटाराचा उंचवटा मोठा अडथळा ठरत असून, भविष्यात येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून या गटाराची उंची व रस्त्याची रचना तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच 

महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com

सचिन काजरोळकर



नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने अपघात होण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

0 Comments