Type Here to Get Search Results !

भांडुप पोलिसांची मोठी कारवाई!

 भांडुप पोलिसांची मोठी कारवाई!




₹५० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; ९ आरोपी ताब्यात

मुंबई |प्रतिनिधी

भांडुप पश्चिम येथील नाहूर परिसरात प्रतिबंधित गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक व साठवणूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भांडुप पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ₹५० लाख किमतीचा सुगंधित प्रतिबंधित गुटखा, एक कंटेनर आणि चार वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४.२५ वाजता मुंबई महानगरपालिका पार्किंग, व्हिलेज रोड, नाहूर, भांडुप पश्चिम येथे कंटेनर क्रमांक KA 02 AM 5883 मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. सदर गुटखा इतर वाहनांमध्ये भरून पुढे वाहतूक करण्याची तयारी सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.




🚔 १ कंटेनर व ४ वाहनांसह मुद्देमाल जप्त

भांडुप पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड व त्यांच्या पथकाने कारवाई करत गुटख्यासह संबंधित वाहने आणि ९ आरोपींना ताब्यात घेतले.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच 

महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com

सचिन काजरोळकर



जप्त मुद्देमाल :

अंदाजे ₹५० लाखांचा सुगंधित प्रतिबंधित गुटखा

₹४५ लाखांचा कंटेनर क्रमांक KA 02 AM 5883

₹१० लाखांचा Mahindra Vero टेम्पो

₹१० लाखांचा Ashok Leyland टेम्पो क्रमांक MH 03 DV 6416

₹१० लाखांची Mahindra Bolero क्रमांक MH 04 LY 9542

₹१० लाखांची Mahindra Bolero Pickup क्रमांक MH 04 KF 5458

पुढील कायदेशीर कारवाई सुरू

कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला (Food & Drug Administration) तात्काळ कळविण्यात आले. फूड सेफ्टी ऑफिसर सागर दनाने व त्यांचे पथक घटनास्थळी उपस्थित असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भांडुप पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतुकीला मोठा धक्का बसला आहे. पुढील तपासातून या गुटख्याचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments