पनवेल महानगरपालिका लागू करणार आपल्या कामगारांना वैद्यकीय विमा योजना
उरण दि २४(विठ्ठल ममताबादे) दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन च्या शिष्टमंडळाने कर्तव्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर,महापौर नितीन पाटील,आयुक्त मंगेश चितळे सभागृह नेते परेश ठाकूर,सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार यांची भेट घेऊन पनवेल महापालिकेमध्ये झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि लोकसंख्येला दैनंदिन जीवनावश्यक सेवा देणारा हा कामगार वर्ग स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या पनवेल नगरपालिकेच्या कायम तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
यावेळी उपस्थित मान्यवर आमदार प्रशांत ठाकूर,महापौर नितिन पाटील, आयुक्त मंगेश चितळे,सभागृह नेते परेश ठाकूर, सभागृह नेते अँड प्रकाश बिनेदार यांनी उत्स्फूर्तपणे पनवेल नगरपालिकेच्या कंत्राटी आणि कायम कामगारांच्याप्रती अतीशय संवेदनशीलता राखून युनियनच्या मागणीला योग्य व सकारात्मक प्रतिसाद देत येत्या दिवाळी सणापूर्वी पनवेल महानगरपालिकेतील सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी वैद्यकीय विमा योजना (मेडिकल इन्शुरन्स) लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे सरचिटणीस कामगार नेते अनिल जाधव यांनी कामगारांच्या अन्य प्रलंबित प्रश्नांवर देखील चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
या चर्चेतयुनियनचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते ॲड. सुरेश ठाकूर कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव,कोषाध्यक्ष दत्तगुरू म्हात्रे, कार्यालय प्रमुख महेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष संजय जाधव, किरण मोहिते, वैभव पाटील, योगेश्वर पाटील, रविंद्र गायकवाड, कैलाश जाधव, अरूण कांबळे, मनोज कांबळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल युनियनच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.


Post a Comment
0 Comments