अलिबाग बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र जोशी
उपाध्यक्षपदी ॲड. मानसी म्हात्रे; परिवर्तन आघाडीच्या ॲड. वैशाली बंगेरा सहसचिवपदी निवड.
उरण (प्रविण पाटील)
अलिबाग बार असोसिएशनच्या बहुप्रतिक्षित व चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र जोशी यांनी बाजी मारली असुन त्यांनी परिवर्तन आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. जितेंद्र भगत यांचा ५६ मतांनी पराभव केला. दरम्यान, उपाध्यक्षपदी ॲड. मानसी म्हात्रे व ॲड. अनंत पाटील, तर खजिनदारपदी ॲड. पुष्कर मोकल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सहसचिव पदासाठी झालेली निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. यात परिवर्तन आघाडीच्या ॲड. वैशाली बंगेरा यांनी ॲड. पल्लवी तुळपुळे यांचा तब्बल ७० मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करत विजय मिळवला.
शुक्रवार दिनांक. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. सायंकाळी ५ वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका तासाने मतमोजणीस प्रारंभ झाला. संपूर्ण मतमोजणी दरम्यान वकील वर्गात प्रचंड उत्सुकता व चुरस पाहायला मिळाली. अखेर रात्री अडीच वाजेच्या सुमारास अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष: ॲड. सुरेंद्र जोशी
उपाध्यक्ष: ॲड. मानसी म्हात्रे व ॲड. अनंत पाटील
सचिव: ॲड. राजेंद्र माळी
सहसचिव: ॲड. वैशाली बंगेरा (परिवर्तन पॅनल)
खजिनदार: ॲड. पुष्कर मोकल
अंतर्गत हिशेब तपासनीस (ऑडिटर): ॲड. विनोद माळी
नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्य
ॲड. हितेश पाटील, ॲड. निवास पाटील, ॲड. अझहर घट्टे, ॲड. मिलिंद साळावकर, ॲड. जयमाला पाटील, ॲड. सुलभा पाटील, ॲड. चैताली मगर आणि ॲड. अश्विनी म्हात्रे.
निकाल जाहीर झाल्यानंतर अलिबाग बार असोसिएशनच्या उपस्थितांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नव्या कार्यकारिणीकडून वकील वर्गाच्या हितासाठी उत्तम कामकाज होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments