उरण तालुक्यात सुसज्ज आरोग्य सुविधांचा अभाव; तातडीच्या उपचारांभावी रुग्णांची परवड, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची मागणी तीव्र!
उरण दि. १३ उरण प्रतिनिधी -
उरण तालुक्यामध्ये अत्याधुनिक आणि सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची सोय नसल्याने स्थानिक नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आजही मुंबई, वाशी किंवा बेलापूर येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः चाळीशी पार केलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराच्या (हार्ट अटॅक) समस्या वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, तालुक्यात वेळेवर हृदय तपासणी आणि तातडीचे प्रथमोपचार मिळण्यात अडचणी येत असल्याने रुग्णांची प्रकृती चिंताजनक बनत आहे.
या गंभीर परिस्थितीची प्रचिती नुकतीच आली असून, करंजा येथील नवापाडा परिसरातील एका ५० वर्षीय पुरुषाला हृदयविकाराच्या (हार्ट अटॅक) तीव्र झटक्याने आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधित नागरिकाला त्रास सुरू झाल्यानंतर स्थानिक पातळीवर तातडीने अत्याधुनिक वैद्यकीय तपासणी किंवा आपत्कालीन उपचार मिळू शकले नाहीत. आणि वेळेत योग्य वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
हृदयविकाराच्या रुग्णांसोबतच किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनाही उरणमध्ये पुरेशा डायलिसिस सुविधांभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नियमित डायलिसिससाठी रुग्णांना नजीकच्या शहरांमध्ये प्रवास करावा लागत असल्याने त्यांचा शारीरिक आणि आर्थिक भार वाढला आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु, अद्यापही यावर ठोस उपाययोजना न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात मोठी नाराजी पसरली आहे. निवडणुकांच्या काळात आरोग्य सुविधांच्या आश्वासन दिले जाते .मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बदलत नसल्याचे भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे उरण मधील वाढती लोकसंख्या आणि अशा निष्पाप बळींची संख्या लक्षात घेता येथे सर्व सोयीनीं युक्त शासकीय किंवा निमशासकीय मल्टी स्पेशालिटी रुग्णालय लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सचिन रमेश डाऊर समाजसेवक -> उरण तालुक्यांत केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं मोठं मोठे प्रकल्प उभारण्यात येतं असताना, उरण मध्ये साधं मल्टी स्पेशालटी हॉस्पीटल नसावं. ही बाब म्हणजे जनतेच्या आरोग्या कडे राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणे चा हलगर्जी पणा दर्शवतं आहे. लवकारत लवकर सुसज्ज उभारण्यात यावं हिच अपेक्षा.


Post a Comment
0 Comments