Type Here to Get Search Results !

उरणचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांची पिल्लई एच.ओ.सी. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आय टी विभागप्रमुखपदी पदोन्नती

 उरणचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांची पिल्लई एच.ओ.सी. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आय टी विभागप्रमुखपदी पदोन्नती





उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांची पिल्लई एचओसी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुखपदी (एचओडी) पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे उरण परिसरासह शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


डॉ. मोहम्मद आमिर शेख यांनी या पदोन्नतीबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. वासुदेवन पिल्लई सर, प्राचार्य डॉ. जगदीश डब्लू. बाकल सर आणि फ्रनव पिल्लई सर यांचे मनःपूर्वक आभार मानले. या मान्यवरांनी दाखविलेला विश्वास, दिलेले प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण सहकार्य याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


विभागप्रमुख म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारताना विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक बदलांशी त्यांना अवगत करणे तसेच संशोधन, नवोपक्रम आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार डॉ. शेख यांनी व्यक्त केला.


त्यांच्या या पदोन्नतीमुळे उरण, रायगड परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या यशाबद्दल विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments