भीमाशंकरच्या जंगलांवर कुऱ्हाड; प्रकल्प स्थलांतरित करा!
टोरोंट पॉवरच्या वृक्षतोडीला आरटीआय कार्यकर्ता महासंघाचा विरोध; मुख्यमंत्र्यांना निवेदन
दिनांक २ उरण (प्रविण पाटील)
सह्याद्री-भीमाशंकर पर्वतरांगेतील वृक्षतोड थांबवून टोरोंट पॉवरचा ऊर्जा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी ठाम मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उरण यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदार उरण यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात उभारण्यात येणाऱ्या ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. सह्याद्री-भीमाशंकर पर्वतरांग जैवविविधतेने समृद्ध असून, येथील जंगलांचे नुकसान झाल्यास पर्यावरणीय संतुलनावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास होऊ देऊ नये, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
विकास हवा; पण पर्यावरणाचा बळी नको!*
औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रातील विकासाला महासंघाचा विरोध नाही. मात्र, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या क्षेत्रात वृक्षतोड करून प्रकल्प उभारणे योग्य नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
💥 जाहिरात 💥
अशा प्रकल्पांसाठी पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचेल, अशा पर्यायी जागेची निवड करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
🌴भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड तातडीने थांबवावी,🌳🌳🌲🪵
प्रकल्पाला दिलेल्या पर्यावरणविषयक परवानग्यांची पुनर्तपासणी करावी आणि प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
याप्रसंगी महासंघातर्फे श्री मधुसूदन म्हात्रे, सौ तृप्ती भोईर ,श्री नरेश कोळी श्री अनंत तांडेल श्री घनश्याम भोईर ,श्री अजय कातकरी,आणि श्री विश्वास पटवर्धन उपस्थित होते.
शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने दिला आहे.




Post a Comment
0 Comments