क्रांतीज्योती सावित्रीबाई चर्मकार महिला मंडळ उरण कोटनाका (बालई)इथे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा.
वार्ताहर
उरण -दिनांक- ९मार्च, २०२५ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई चर्मकार महिला मंडळ उरण कोटनाका येथे महिला दिन’ मोठया उत्साहात साजरी करण्यात आला .
दर वर्षी ८ मार्च हा दिवस जगभरात "जागतिक महिला दिन" म्हणून उत्साहात साजरा केला जातो.स्त्री सक्षमीकरण आणि महिलां भगिनींच्या सर्वांगीण विकासा करिअ
सुरुवातीला महिला मंडळाच्या सदस्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केलl
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रुपाली बाबल्याशेठ चव्हाण यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उद्देश नेमका काय आहे, याविषयी मते नोंदविली. सामाजिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. ‘समान-संधी,समान-न्याय’ उपलब्ध करून देणे असे मनोगत व्यक्त केले.
सौ. सरिता सावर्डेकर यांनी आपल्या मनोगतातून स्त्रियांचे सामाजिक क्षेत्रात स्थान अल्प असण्याचे प्रमुख कारण म्हणजे स्त्रियांच्या जीवनात ‘संघर्ष’ अटळ असल्याचे नमूद केले.सर्वच स्तरावर महिलांना संघर्ष करावा लागतो आहे.
सौ. वर्षा पेवेकर यांनी महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.सर्व महिलांना सकाळी योगा,कसरत योग्य असा वायाम करण्याची विनंती केली. जोपर्यंत स्त्रीचा आत्मसन्मान या समाजात जपला जाणार नाही तोपर्यंत स्त्री-परुष समानता येणार नाही असेही त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने महिला उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments