*_─⊱━━━━⊱(💞)⊰━━━━━⊰─_*
*_─⊱━━━━━⊱(💞)⊰━━━━⊰─_*
बातम्या आणि जाहिराती साठी mail id
mahaindia24@gmail.com.
uranshahar@gmail.com
•─╼⃝𖠁༄⃝₹𝓪𝓳Ⓜमहा इंडिया न्यूज𖠁⃝╾─•
*_─⊱━━━━⊱(💞)⊰━━━━━⊰─_*
*_─⊱━━━━━⊱(💞)⊰━━━━⊰─_*
उरण मध्ये शिवसेना उद्धव ठाकरेगटाचा भव्य मेळावा
वार्ताहर पुजा चव्हाण
उरण विधानसभा उरण-पनवेल-खालापूरमधील निष्ठावंत शिवसैनिकांचामार्गदर्शन मेळावा 29जून 2025 रोजी उरण येथील जेएनपीए निवासी संकुलांतील बहुउद्देशीय सभागृहात मोठया उत्साहात साजरा झाला.यावेळी मेळाव्यास मार्गदर्शन करण्या साठी शिवसेना नेते भास्कर जाधव, शिवसेनाऊपनेते विश्वनाथ नेरूरकर, शिवसेनानेते सचिन अहिर, रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, जेएनपीटीचे विश्वस्ततथा माजी जिल्हा प्रमुख तथा जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील,उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर ,कोकण युवा सेना प्रमुख- शिरसाठ, उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत, रायगड जिल्हा युवा अधिकारी पराग मोहिते, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर,जिल्हा निहाय वक्ता मनीषा ठाकूर,रायगड जिल्हा महिला संघटिका सुवर्णा जोशी,खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे,संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, मेघा मिस्त्री, ज्योती म्हात्रे- संघटिका,शिव विधी व न्याय सेवा उरण तालुका वर्षा पाठारे, उरण तालुका संघटक बी एन डाकी, पनवेल तालुका प्रमुख महेंद्र गायकर,उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर,माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, संपर्क प्रमुख दिपक भोईर,द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर,शहर संघटक महेश वर्तक,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका संघटक ओमकार घरत, उरण शहर संघटक संदीप जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी पक्षात सर्वात मोठे पद हे शिवसैनिकाचे असल्याचे सांगूनते शिवसेना नेते भास्कर जाधव, पुढे म्हणाले बाळासाहेबांचे विचार व शिवसेनेचे कार्य खेडोपाडी पोहोचविणे ही आज काळाची गरज आहे. ग्रामीण भागात नागरिकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न शाखा प्रमुखानी केलापाहिजे असे तेम्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संवाद साधून शिवसेना घराघरात पोहोचवली पाहिजे.,अलीकडे सातत्याने घडत असलेल्या राजकारणामुळे शाखाप्रमुखांचा आपापल्या परिसरांतील नागरिकांशी व मतदारांशी त्यांच्या संवाद तुटला आहे. शाखाप्रमुख हा काम करीत नसल्याने शिव सेना कमकुवत झाला.त्यामुळे पक्षाचे खूप मोठे नुकसान होत आहे. शाखाप्रमुखांनी आळस झटकूनकामाला लागण्याचीहीच वेळ आहे.असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगटाचे नेते भास्कर जाधव यांनीआपल्या मर्गदर्शन पर विचार मांडतानासांगितले ते उरण येथे 29जून 2025 रोजी जेएनपीए निवासी संकुलांतील बहुउद्देशीय सभागृहात संपन्न झालेल्याउद्धव ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसेनिकाना मार्गदर्शन करते वेळी मांडले.व महायुतीच्या विविध योजना,व निर्णयावरफसवे असल्याचे सागून यामध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेचा ही समाचार
बातम्या आणि जाहिराती साठी mail id
mahaindia24@gmail.com.
uranshahar@gmail.com
तर या मेळाव्याला उपस्थित असलेले शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांनी आपल्या ओघवती शैलीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्याशी संवाद साधला शिवसेना संपविण्याचे स्वप्न कुणीही पाहू नये ज्यांनी शिवसेना सोडली ती स्वतःच्या स्वार्थासाठी सोडली. असल्याचे तेम्हणले अशी चूक तुम्ही करू नका, प्रत्यक्ष काम करणे कठीण असते अगोदरच्या काळात निष्ठेला किंमत होती आता मात्र गद्दारीला किंमत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर प,रिषद निवडणुका जवळ आले आहेत आता सर्वांनी कामाला लागा. आत्म विश्वासाने काम करा असे ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाते म्हणाले.
यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनीही पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.मला राजकारणाचा कोणताही गंध नव्हता तरी राजकारणात आलो. जनतेने मला 2014 साली आमदार बनवले. त्यापूर्वी वेगवेगळे पदे भूषविली.निवडणुकीत झालेला पराभव हा माझा नाही.पैशांमुळे माझा पराभव झाला. येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद,नगर परिषद निवडणुका जिंकल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.सर्वांनी आतापासून तयारीला लागा असे आवाहन मनोहरशेठ भोईर यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झाली. या मार्गदर्शन मेळाव्याला उरण पनवेल खालापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.


.jpg)

Post a Comment
0 Comments