उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. सत्या ठाकरे
“मेडिकल एक्सेलन्स अवार्डने” सन्मानित
प्रतिनिधी पुजा चव्हाण
आज समस्त उरणकरना अभिमान वाटावा अशी गोष्ट होती,ती म्हणजे उरणकरांचे आवडते आणि उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ.सत्या ठाकरे यांना “मेडिकल एक्सेलन्स अवार्डने” सन्मानित केल्याची.त्यांच्या झालेल्या सन्मानामुळे त्यांच्यावर अनेक संस्था,पत्रकार,त्यांचा मित्र परिवार, हितचिंतक आणि उरणकर यांच्याकडुन त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ.सत्या ठाकरे यांचेमूळ गाव मेहकर जिल्हा बुलढाणा होय 2000 च्या सुमारास डॉक्टर सत्या हे उरणात आले,उरणकरनी त्यांच्यावर इतका प्रेमाचा वर्षाव केला की ते 25वर्षाच्या कालवधीत उरणकरांचे कधी होऊन गेले ते समजलेच नाही,उरणच्या पंचक्रोशिंतील असा कोणतीही व्यक्ती सापडणार नाही की ती डॉक्टर सत्या ठाकरे यांना ओळखत नाही.उरणच्या प्रवेशव्दारावारच डॉक्टरांचा शारंगधर नावाचे जनरल हॉस्पिटल असून उरणकरांच्या आरोग्याचा प्रथम केंद्रबिंदू आहे, सर्दी-ताप-खोकला या सामन्य आजरा पासून ते अपघातात सापडलेल्या व्यक्तीवर डॉक्टरां कडुन प्रथमिक उपचारा पासून तर कधी किरकोळ अपघाता मधील व्यक्ती त्यांच्या दवाखान्यात दाखल होऊन उपचार घेऊन पूर्णपणे बरी होऊन डॉक्टररांचे आभार मानीत स्वगृही परत जाण्या पर्यंत त्यांची सेवा उपलब्ध असते.24 तासांसाठी उपलब्ध असते.
उरणच्या मातीशी डॉक्टरांचे इतकेच नाते नाही तर त्यांच्या मधुरवाणीने आणि सुहास्यवदनाने अनेक रुग्ण निम्मे तणावमुक्त होऊन अर्धेअधिक बरे होतात.डॉ.सत्या यानी करोना सारख्या जीवघेण्या साथीजन्य अजारातही आपल्या सहकार्यांच्या मदतीने अतुलनीय कामगिरी बजाविली आहे, आजही रुग्णांची सेवा करताना डॉक्टरानी रात्र वा दिवस असो वेळेची मर्यादा कधीच पाळली नाही,हॉस्पिटलमधून कॉल आला की डॉक्टर साहेब रुग्णाच्या सेवे साठी पांच मिनिटात उपस्थित होणार हे गणित ठरलेलेच,.दैनंदिन व्यायामाच्या उपक्रमात पहाटे पांच वाजता द्रोणागिरी डोंगराच्या माथ्यावर वर चढाई करताना अर्ध्या पेक्षा अधिक अंतर चढाई करून गेलेल्या डॉक्टर सत्या ठाकरे यांना माझा गंभीरस्वरुपी आजारी असल्याचा फोन गेला आणि मी त्यांच्या दवाखान्यात पोहचण्यच्या अगोदरच डॉक्टरसाहेब दवाखान्यात हजार होते,ही त्यांच्या कर्तव्याची आणि काम करण्याच्या पद्धतीची पोहचपावती म्हटली तर ते वावगे ठरणारे नाही.
बातम्या आणि जाहिराती साठी mail id
mahaindia24@gmail.com.
uranshahar@gmail.com
डॉक्टरांची बांधिलकी केवळ त्यांच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांपुरतीच नाही तर सामाजिकदृष्ट्या ही तीच बांधिलकी डॉ.सत्या ठाकरे यांनी जपली आहे.नागरी संरक्षणदलाचे प्रशिक्षण घेऊन आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी धावत जाणारे डॉ.सत्या ठाकरे हे उरणकरांनी नियमित पहिले आहेत या त्यांच्या सर्व कार्याची दखल घेत “नॅशनल डॉक्टर्स डे”चे औचित्य साधत “इन मेजर सिटी” व “रायगड मेडिकल असोसिएशनच्या” सौजन्याने नवी मुंबईयेथे संपन्न झालेल्या “आरोग्यंम धनसंपदा” या शानदार सोहळ्या मध्ये उरण मेडीकल असोसिएशनचे सेक्रेटरी तथा उरणकरांचे लाडके धनवंतरीपुत्र डॉक्टर सत्या ठाकरे यांना “मेडिकल एक्सेलन्स अवार्डने” सन्मानित करण्यात आले आहे, त्यांच्या या सन्मानामुळे त्यांच्यावर सर्वस्थरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

.jpg)
Post a Comment
0 Comments