Type Here to Get Search Results !

संगीत के सप्तरंग’ने उलव्यातील भूमिपुत्र भवनमधील रसिक मंत्रमुग्ध

 संगीत के सप्तरंग’ने उलव्यातील भूमिपुत्र भवनमधील रसिक मंत्रमुग्ध 


महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर संगीत मैफल रंगली.

( पूजा चव्हाण यांसकडून)


उरण ता. ८ : उरण उत्कर्ष समितीचे संस्थापक-अध्यक्ष आणि सुमारे चाळीस वर्षे राजकीय वलय निर्माण करणारे गोपाळ पाटील हे संगीतप्रेमीही आहेत.





 त्यांनी निर्मिती केलेला `संगीत के सप्तरंग’ हा हिंदी गाण्यांचा ऑकेस्ट्रा रविवारी उलव्यातील भूमिपुत्र येथे रंगला. महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते दीपप्रज्वल केल्यानंतर संगीत मैफल सुरू झाली. 

यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "स्थानिक कलाकारांना संधी मिळावी, धकाधकीच्या जीवनात पिचलेल्या आणि संगीताची आवड असणाऱ्या रसिकांना आनंद मिळावा, यासाठी मी आग्रही असतो. त्यामुळे कलाकारांना सहकार्य करण्याची माझी भूमिका कायम आहे. गोपाळ पाटील हे उत्कृष्ट कबड्डीपटू, धावपटू आणि मराठी अनेक नाटकांतून अभिनय करून पारितोषिक विजेते अष्टपैलू कलाकार आहेत. 

त्यांचे सामाजिक काम आणि भारदस्त आवाज आजही कायम आहे; परंतु आता त्यांनी आवड जोपासण्यासाठी संगीत क्षेत्रात घेतलेली उडी कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा!"

बातम्या आणि जाहिराती साठी mail id- 

uranshahar@gmail.com ला संपर्क करा




या संगीत मैफलीची सुरुवात धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहून झाली. 'पूर्णिमा' चित्रपटातील धर्मेंद्र आणि मिना कुमारी यांच्यावर चित्रित झालेल्या 'हमसफर हम मेरे हम सफर' या गोपाळ पाटील आणि आकांक्षा भोईर यांनी गायलेल्या गीताने सुरुवात झाली. त्यानंतर 'हिरो' चित्रपटातील 'बिछडे कभी हम बरसो' या उमंग गोस्वामी यांनी सादर केलेल्या गीताने वन्समोअर मिळवला. 'प्रीतीच्या चांद राती', 'ए बंधन तो प्यार का बंधन है' या 'करण-अर्जुन' चित्रपटातील गीताने संगीत मैफलीची सांगता झाली. 

उमंग गोस्वामी, दक्षता स्वरूप, आकांक्षा भोईर, संगीता डे, महेंद्र कारले, राजा भोसले, राहील शेख, रवि नाईक यांच्या समुधर आवाजाने संगीत रसिक मंत्रमुग्ध झाले होते. किरण तोमर यांच्या संगीत संयोजनाने चार चांद लावले. हरिष मोकल यांच्या सूत्रसंचालनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांच्या गमतीजमती अनुभवायला मिळाल्या.  




यावेळी कॉ. भूषण पाटील, रविशेठ पाटील, नरसू पाटील, अॅड. डी. के. पाटील, नरेश रहाळकर, सुधाकर पाटील, विकास नाईक, सदानंद गायकवाड, कृष्णा पाटील, भाऊशेठ पाटील, शरद ठाकूर, मिलिंद पाडगावकर,

आदी मान्यवर उपस्थित होते. या संगीत मैफलीची मुख्य प्रायोजक महेंद्रशेठ घरत संस्थापक- अध्यक्ष असलेली शेलघर येथील `यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था’ होती. आई इन्फ्रा, टीआयपीएल आदी सहप्रायोजक होते. या कार्यक्रमाला धनाजी ठाकूर, भावना घाणेकर यांचेही सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments