🔶उरणच्या माहीर पाटीलची अरबी समुद्रात ऐतिहासिक जलतरण कामगिरी🔶
*उरण दि. २६ मार्च (प्रतिनिधी पूजा चव्हाण)* — उरण येथील कुमार जलतरणपटू माहीर परेश पाटील याने अतुलनीय धाडस आणि चिकाटीचे प्रदर्शन करत घारापुरी बेटावरून अरबी समुद्रात उडी मारून तब्बल १२ किलोमीटर अंतर पोहून गेट ऑफ इंडिया गाठण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने हे अंतर अवघ्या ४ तास ४८ मिनिटे २१ सेकंदांत पूर्ण केले.
माहीरने पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी घारापुरी बेटावरून जलप्रवासास सुरुवात केली. भर समुद्रात, अंधाराच्या छायेत आणि लाटांच्या प्रचंड आव्हानांशी सामना करत त्याने आपले ध्येय गाठले. या प्रवासात समुद्रातील प्रवाह, थंड पाणी आणि अंधार अशा अनेक अडचणींचा सामना करत माहीरने अपूर्व जिद्द दाखवली.
जाहिरात -
बलून डेकोरेश साठी संपर्क करा.
![]() |
या धाडसी मोहिमेत माहीरला संतोष पाटील, राज संतोष पाटील, साई संतोष पाटील, जयेश अशोक पाटील, मयुरेश राजेंद्र पडते आणि हितेश भोईर यांच्यासह अनेक प्रशिक्षक व पर्यवेक्षकांचा मोलाचा सहयोग लाभला. तसेच नेव्हल आर्मामेंट डेपो, करंजा आणि शिवसेना (शिंदे गट) चे उपविभाग प्रमुख महेश पाटील यांनीही सहकार्य केले.
माहीरच्या या मोहिमेचे निरीक्षण विनय शहा यांनी केले. या कामगिरीमुळे माहीरच्या कुटुंबात आणि समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या कुटुंबात पूजा परेश पाटील, परेश किरण पाटील, आजी मंदा किरण पाटील, प्रसाद धर्माजी पाटील आणि आजी सुगंधा प्रसाद पाटील यांचा समावेश आहे.
माहीरच्या या पराक्रमामुळे उरण परिसरासह संपूर्ण मुंबईत अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे उरण आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार माहीरने व्यक्त केला आहे.



Post a Comment
0 Comments