उरण बायपास की प्रवाशांच्या आयुष्याचा ‘बायपास’?
दिशादर्शक फलकांचा अभाव, धोकादायक वळणांवर अपघात; उद्घाटनाच्या घाईत प्रवाशांच्या सुरक्षेचा बळी?
दिनांक १ नोव्हेंबर (प्रविण पाटील)
उरणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी उभारण्यात आलेला बायपास रस्ता आता नागरिकांच्या जिवावर उठणार आहे की काय, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तयार केलेल्या या रस्त्यावरच अपघातांचा धोका वाढत असेल, तर हा विकास नेमका कोणाच्या सोयीसाठी? रस्त्याचे उद्घाटन आणि श्रेय लाटण्याची घाई करताना नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा बळी दिला जात आहे का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
बायपास म्हणजे वाहतुकीचा अडथळा दूर करून प्रवास सुरक्षित आणि सुखकर करणारा मार्ग! मात्र, उरणच्या बायपासची रचना पाहता सुरक्षिततेच्या निकषांना हरताळ फासला गेला आहे की काय, अशी शंका निर्माण होत आहे. धोकादायक वळणे, वळणांवर उभारलेले गतिरोधक आणि रस्त्याची संशयास्पद रचना पाहता वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करायचा की जीव मुठीत धरून मार्ग काढायचा, असा प्रश्न पडत आहे. दिनांक ३१ आक्टोबर रोजी सायकांळी ५ वाजता उरण नगरपालिकेतील कर्मचारी बाबु पाडावे हे अंपग असुन तिनचाकी स्कुटी ने आपला मुलीला घेऊन प्रवास करत होते धोकादायक वळणावर त्यांचा अपघात झाला.
अपघाताची तीव्रता भीषण होती दैव बलवत्तर म्हणून त्यांचा आणि मुलीचा जीव वाचला . घाईघाईत उद्घाटन उरकण्यासाठी हा बायपास थेट उरणच्या स्मशानभूमीजवळच आणून सोडण्यात आला आहे का? नागरिकांना सुरक्षित प्रवास देण्याऐवजी त्यांना स्मशानभूमीचा रस्ता दाखवायचा आहे काय, असा बोचरा सवालही आता उपस्थित होत आहे.
प्रशासन अपघाताची वाट पाहणार की तातडीने जागे होणार?
उरण बायपासवर आवश्यक दिशादर्शक फलक बसवावेत, धोकादायक वळणांची तांत्रिक तपासणी करावी, गतिरोधकांबाबत योग्य उपाययोजना कराव्यात आणि रस्ता सुरक्षिततेच्या निकषांनुसार आहे की नाही, याची पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तसेच सदर उरण बायपास रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने जनतेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments